Yami Gautam Movie Box Office Collection : अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) 'आर्टिकल 370' (Article 370) हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होऊन चार दिवस पूर्ण झाले आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता रिलीजच्या चौथ्या दिवशी मात्र या सिनेमाच्या कमाईत घसरण पाहायला मिळत आहे. 


'आर्टिकल 370'च्या कमाईत रिलीजच्या चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या सिनेमाचं कौतुक केलं. तर दुसरीकडे आखाती देशांमध्ये या सिनेमावर बंदी घातली आहे. 


'आर्टिकल 370'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Article 370 Box Office Collection Day 4)


यामी गौतमचा 'आर्टिकल 370' हा सिनेमा 23 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. रिलीजआधीपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे पहिल्या वीकेंडला या सिनेमाने 25 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 'आर्टिकल 370' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 5.9 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 7.4 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.6 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने फक्त 3.60 कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 29.05 कोटींचा गल्ला जमवला आहे. 



  • पहिला दिवस : 5.9 कोटी

  • दुसरा दिवस : 7.4 कोटी

  • तिसरा दिवस : 9.6 कोटी

  • चौथा दिवस : 3.60 कोटी

  • एकूण कमाई : 29.05 कोटी


'आर्टिकल 370' या सिनेमात यामी गौतम जूबी हस्कर नामक एका लोकल एजेंटची भूमिका साकारली आहे. आदित्य जांभळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर यामी गौतमचा पती आदित्य धरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य धर निर्मित 'उरी' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. 


'आर्टिकल 370' या सिनेमात यामी गौतम, अरुण गोविल आणि किरण कर्माकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अरुण गोविल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. तर किरण कर्माकर यांनी अमित शाह यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.




संवेदनशील मुद्यावर भाष्य करणाऱ्या 'आर्टिकल 370' या सिनेमाबद्दल रिलीजआधीत वेगवेगळी मते व्यक्त केली जात होती. यामी गौतमच्या या सिनेमात जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानातील 'अनुच्छेद 370' हटवण्याबाबतची गोष्ट दाखवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Article 370 Movie : PM मोदींनी कौतुक केलेल्या 'आर्टिकल 370' चित्रपटाला मोठा धक्का, आखाती देशांमध्ये बंदी