मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी कंगना रणौत बॉलिवूडमधील दिग्गजांची नावं घेऊन सतत आरोप-प्रत्यारोप करत आहे. एवढचं नाहीतर गेल्या काही दिवसांपासून कंगनाने ट्वीट करत नावानिशी आरोपांचं सत्र सुरु ठेवलं आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर, आदित्य चोप्रा आणि महेश भट्ट यांच्यासह अनेकांना मूव्ही माफिया असं संबोधत कंगनाने थेट निशाणा साधला होता. आता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर कंगनाने आता बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वापरावर खुलासा केला आहे.


कंगना रणौतने पीएमओला टॅग करत एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये तिने रणवीर सिंह, विक्की कौशल, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांना ड्रग टेस्टसाठी ब्लड सॅम्पल्स देण्यासाठी सांगितलं आहे. कंगनाने ट्वीट केलं आहे की, 'मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांच्याकडे विनंती करते की, त्यांनी आपले ब्लड सॅम्पल्स ड्रग्ज टेस्टसाठी द्यावेत. अशी अफवा आहे की, तुम्ही सगळे कोकेनच्या आहारी गेला आहात. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही या अफवा खोट्या ठरवाव्या.'


कंगना रणौतचं ट्वीट :





कंगनाने पीएमओला केलं टॅग


कंगनाने ट्वीटमध्ये पीएमओला टॅग केलं आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'जर या सर्व स्टार्सचे सॅम्पल्स नॉर्मल आले, तर यामुळे लाखो तरुण प्रेरित होतील.' कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. इंडस्ट्रीच्या पार्ट्यांमध्ये खुलेआम ड्रग्स, कोकेन, गांजा इत्यादींचं सेवन खुलेआम केलं जातं. कंगनाने हा खुलासा केल्यानंतर बॉलिवूडच्या कोणत्याही सेलिब्रिटीने एकही रिअॅक्शन दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे.


कंगनाच्या आरोपांनंतरही बॉलिवूडचं मौन


ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर बोलताना एवढ्या मोठ्या आरोपानंतरही बॉलिवूड गप्प का आहे, असा सवाल उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, कंगना जर ड्रग्ज अॅडिशनचा आरोप लावत असेल तर बॉलिवूडचे सेलिब्रिटी याप्रकरणी रिअॅक्शन का देत नाहीत? महेश जेठमलानी यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देत अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली की, 'प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले-वाईट लोकं असतात. पण एका खराब सफरचंदामुळे संपूर्ण टोपल्यातील सफरचंदं खराब होत नाहीत.'


महत्त्वाच्या बातम्या :