Kangana Ranaut: गेल्या वर्षी अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) 12 वी फेल (12th Fail)  हा चित्रपट  थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. आता अभिनेत्री कंगना रानौतनेही (Kangana Ranaut) '12वी फेल' या चित्रपटाचं आणि या चित्रपटामधील अभिनेता विक्रांत मेस्सीचं कौतुक केलं आहे.  कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये विक्रांतची तुलना  दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली आहे.


कंगनानं  केलं'12 वी फेल' चित्रपटाचं कौतुक



कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं,  "हा खूप अप्रतिम चित्रपट आहे. ग्रामीण खेडेगावातून हिंदी माध्यमातील शिक्षण घेतलं असल्यामुळे आणि शालेय वर्षात आरक्षणाशिवाय प्रवेश परीक्षेसाठी बसलेली विद्यार्थी असल्याने, मी संपूर्ण चित्रपट बघताना रडत होते. मी विमानात हा चित्रपट पाहिला आणि विमानात मी कधीच एवढी रडले नाही. माझे सहप्रवासी माझ्याकडे काळजीने बघत होते."




कंगनानं  इरफान खानशी केली विक्रांती तुलना केली 


कंगनानं इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर करुन '12 वी फेल'  या चित्रपटातील अभिनेता विक्रांतची तुलना  दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली आहे.तिनं पोस्टमध्ये लिहिलं,  'विधू सरांनी पुन्हा एकदा माझे मन जिंकले आहे. विक्रांत तू आश्चर्यकारक आहे ! त्याच्या आगामी काळात तो इरफान खान साहेबांच्या उणिवा पूर्ण करू शकेल.तुझ्या टॅलेंटला माझा सलाम'




कंगना विक्रांतीला म्हणाली होती झुरळ


2021 मध्ये कंगनाने विक्रांतला 'झुरळ' असे म्हटले होते. अभिनेत्री यामी गौतमनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला विक्रांतने कमेंट केली," राधे माँ सारखी शुद्ध आणि पवित्र" विक्रांतच्या या कमेंटला कंगनानं रिप्लाय दिला, "कहां से निकला ये कॉकरोच. लाओ मेरी चप्पल"


'12वी फेल' या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. हॉटस्टार  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या यांच्या जीवनावर आधारित आहे.






ही बातमी वाचा : 


Majha Katta : शिपायाचं काम केलं, श्रीमंतांची कुत्री फिरवली, संघर्ष केला पण IPS झाला; '12th Fail' मनोज कुमार शर्मांची इनसाईड स्टोरी