Kangana Ranaut ON Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचं शाहरुखच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतने 'पठाण' सिनेमासंदर्भात ट्वीट केलं आहे.
कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर कमबॅक केलं आहे. आता कंगनाने ट्वीट करत लिहिलं आहे की, "शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा यशस्वी झाला असला तरी देश 'जय श्री राम'चा जयघोष करेल. नागरिकांचं देशावरचं प्रेमचं या सिनेमाला यशस्वी करेल".
कंगनाने पुढे लिहिलंय की, "भारतात 80 टक्के हिंदू लोक राहतात आणि अशा देशात 'पठाण'सारख्या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS दाखवला गेला आणि तो सिनेमा यशस्वी झाला ही भारतीयांसाठी महत्त्वाची बाब आहे.
कंगनाने दुसरं ट्वीट करत लिहिलं आहे, "शाहरुख खानचा 'पठाण' यशस्वी झाला तरीही देशातील मंडळी 'जय श्री राम'चा जयघोष करतील. भारतीय नागरिकांचं भारतावर असलेल्या प्रेम या सिनेमाची खरी ताकद आहेत. भारतातील मुस्लिम हे अफगाण पठाणांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळेच माझा विश्वास आहे की, भारताचा कधीच अफगाणिस्तान होणार नाही. त्यामुळे या सिनेमाचं नाव 'पठाण'पेक्षा 'भारतीय पठाण' असं असायला हवं होतं.
'पठाण' सारखे सिनेमे चालायवा हवे : कंगना रनौत
'पठाण'च्या यशाबद्दल बोलताना कंगना रनौत म्हणाली आहे, "पठाण' सारखे सिनेमे चालायला हवेत. 'पठाण' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येक जण आता आपल्या सिनेमावर काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सिनेसृष्टीत बहरलेली दिसेल. प्रेक्षकांना वेगवेगळ्या दर्जाचे सिनेमे पाहता येतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :