मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी हे देशद्रोही आहेत, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केलं आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला. ती म्हणाली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात.
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. फिल्म इंडस्ट्री देशद्रोही लोकांनी भरली आहे. आपल्याला पाकिस्तानच्या बंदीवर नाही तर त्याच्या विनाशावर फोकस करायला हवं, असं कंगना म्हणाली.
शबाना आझमी आणि जावेद अख्तर एका कार्याक्रमानिमित्त पाकिस्तानला जाणार होते. मात्र पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी कार्यकम रद्द केला होता. यावरुन कंगनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला.
माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी काल पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असं म्हणाले होते. यावर कंगनाने नाव न घेता सिद्धूंवर निशाणा साधला. ती म्हणाली, जवानांवर हल्ला केला जात आहे आणि काही लोक अहिंसा आणि शांतीच्या गोष्टी करत आहेत. असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे, अशा शब्दात तिने सिद्धूंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी देशद्रोही : कंगना रनौत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2019 09:27 AM (IST)
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधला. ती म्हणाली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -