Kangana Ranaut Wedding Update : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता 'पंगाक्वीन' लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 


कंगना रनौतने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. 'पंगाक्वीन'च्या या सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कंगना आपल्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित एक नवी अपडेट समोर आली आहे. कंगना रनौत 2024 मध्ये लग्न करणार असल्याचा दावा केआरकेने केला आहे. 






कमाल आर खानचं ट्वीट काय आहे? (KRK Tweet)


अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) उर्फ केआरके (KRK) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सिनेमांचं परिक्षण करण्यासोबत बॉलिवूडकरांबद्दल तो त्याचं मत मांडत असतो. आता त्याच्या एका ट्वीटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कमाल आर खानने ट्वीट केलं आहे की,"ब्रेकिंग न्यूज : अभिनेत्री कंगना रनौत डिसेंबर 2023 मध्ये एका उद्योगपतीसोबत लग्न करणार आहे. एप्रिल 2024 मध्ये अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे".


केआरकेच्या ट्वीटवर सुखी व्यक्ती, कंगनाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, बॉलिवूड स्टार की आणखी कोणी, खूप खूप शुभेच्छा कंगना रनौत अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. कंगना रनौत लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आता कंगनाचा होणारा पती उद्योगपती असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता तिचा हा पती नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Movies)


कंगना रनौतचा आगामी 'तेजस' (Tejas) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच 'इमरजेंसी' (Emergency) आणि 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमातही ती झळकणार आहे. कंगनाचा 'धाकड' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाचीदेखील कंगनाने निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या


Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर आऊट! कंगना रनौतच्या रौद्र रुपाने वेधलं लक्ष