मुंबई: कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असते. सध्याही तिने सोशल मीडियावर स्वत: बद्दल असेच मत मांडले आहे. तीने आपली तुलना तीन वेळा ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी आणि गल गॅडोटशी केली आहे आणि आपण या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री आहोत असाही तिने दावा केला आहे.


कंगना तिच्या धाकड (Dhaakad) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अॅक्शनपट असल्याचं समजतंय. या चित्रपटाचे काही फोटो कंगनाने आपल्या ट्विटरवर शेअर केले असून तीने स्वत:ची तुलना तीन वेळा ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि अभिनेत्री गल गॅडोट यांच्याशी केली आहे.


कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये लिहलंय की, "मी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स करतेय त्या प्रकारचा परफॉर्मन्स या पृथ्वीतलावर कोणीही करु शकत नाही. मेरिल स्ट्रीप ज्या पद्धतीने अभिनय करते त्याच प्रकारचे कौशल्य माझ्याकडे आहे आणि गल गॅडोटप्रमाणे ग्लॅमर आणि अॅक्शन माझ्यात आहे. थलायवी आणि धाकड."





Kangana Ranaut Case | बीएमसीच्या वकिलांसाठी लाखो रुपये मोजल्याच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली


कंगनाने आपली तुलना मेरिल स्ट्रीपशी केल्यानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना कंगना म्हणाली की, "काही मला विचारतात की मला किती ऑस्कर मिळाले, त्यांनी मेरिल स्ट्रीपलाही विचारलं पाहिजे की तिला किती पद्म पुरस्कार मिळाले. याचं उत्तर नकारार्थी असेल. तुमच्या गुलामी मानसिकतेतून बाहेर या आणि स्वत: बद्दल काही आदर कमवा."





कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणते की, "या पृथ्वीतलावर माझ्यापेक्षा जास्त रेंज आणि चांगला क्राफ्ट दाखवणारी अभिनेत्री असेल तर मी माझा अहंकार सोडायला तयार आहे. पण तोपर्यंत मी माझ्या गर्वाचा आनंद घेणार. या माझ्या मतावर खुलेपणाने चर्चा करायला तयार आहे."





कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल