Dhaakad : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या लॉकअपमुळे चर्चेत आहे. अशातच तिच्या आगामी 'धाकड' (Dhaakad) सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 

Continues below advertisement


कंगनाचा धाकड सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात कंगनाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. सिनेमात कंगना  एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे.





'धाकड' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाची कथा राजी यांनी लिहिली आहे. रितेश शहा यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे.  कंगना व्यतिरिक्त या सिनेमात अर्जुन रामपाल, दिव्या दत्तादेखील दिसणार आहेत.





संबंधित बातम्या


Jhund : ...जेव्हा ‘महानायक’ प्रत्यक्ष भेटले! रिंकू-आकाशने शेअर केला ‘झुंड’चा अनुभव


JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!


भाऊ कदम कॉलर उडवत म्हणाला स्टाईल इज स्टाईल, उदयनराजेंनी मारला डोक्यावर हात! नेमकं काय घडलं?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha