Vikram : सध्या सिनेमागृहात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. 'वलिमै', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवला आहे. आता कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आला आहे. या सिनेमाने रिलीजआधीच 204 कोटींची कमाई केली आहे.
'विक्रम' सिनेमाचे बजेट 150 कोटी होते. त्यामुळे रिलीजआधीच निर्मात्यांना नफा मिळाला आहे. सिनेमाने रिलीजआधीच 54 कोटींचा नफा केला आहे. रिलीजआधीच बजेटपेक्षा अधिक कमाई करणारा कमल हासन यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कंगराजने सांभाळली आहे. दाक्षिणात्य सिनेमे कोट्यवधींची कमाई करतच असतात. आता या यादीत कमल हासनच्या 'विक्रम' सिनेमाचादेखील समावेश आहे.
'विक्रम' सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी म्हटले आहे की, कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा रिलीजआधीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
3 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कमल हासन व्यतिरिक्त विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचीदेखील झलक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत 'विक्रम' सिनेमाची चर्चा
कमल हासनचे चाहते 'विक्रम' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याच्या चार दिवस आधीच चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर रांगा लाऊन तिकीटे विकत घेतली आहेत. चाहत्यांनी पहाटे चार वाजल्यापासून सिनेमागृहाबाहेर रांगा लावल्या होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या 'विक्रम' सिनेमाचीच चर्चा आहे.
संबंधित बातम्या