Cannes 2022 : सध्या संपूर्ण सिनेजगताच्या नजरा 'कान्स फिल्म फेस्टिवल'कडे (Cannes Film Festival 2022) लागल्या आहेत. या महोत्सावात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. नुकतेच कमल हासन (Kamal Haasan) आणि ए. आर रहमानने (AR Rahman) 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावली आहे. ए.आर रहमानने कमल हासनसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ए.आर रहमानने फोटो शेअर करत लिहिले आहे,'थलाइवर और आनंदर'. ए आर रहमान यांनी 'रंग दे बसंती'सह कमल हासन यांच्या अनेक सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या पहिल्या दिवशी आर.माधवन यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
'कान्स फिल्म फेस्टिवल' दरम्यान ए.आर रहमान म्हणाले, 'कान्स फिल्म फेस्टिवल' ला हजेरी लावणं खूप अभिमानास्पद आहे. माझ्या सिनेमाचा प्रीमिअर 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये होणार असल्याने मी खूपच आनंदित आहे.
आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. यंदाचा हा महोत्सव भारतासाठी खूपच खास आहे. या महोत्सवात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. या महोत्सवात सहा मराठी सिनेमांचा समावेश आहे.
अनुराग ठाकूर यांनी शेअर केले महोत्सवातील फोटो
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या पहिल्या दिवसाचे फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे, भारतासाठी ऐतिहासिक क्षण. भारताला 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मानदेखील मिळाला आहे.
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' कलाकार सहभागी
75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या