Maithili : तेलगू अभिनेत्री मैथिलीने (Maithili) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या घेत मैथिलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस मैथिलीच्या घरी पोहोचले आणि तिचे प्राण वाचवले आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. सध्या मनोरंजनसृष्टीतून अनेक आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. गेल्या 15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे. 


पोलिसांनी वाचवला जीव


पोलीस फोनचे सिग्नल टॅक करत मैथिलीच्या घरी पोहोचले. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत आढळली. लगेचच पोलिसांनी तिला उपचारासाठी जवळच्या निम्स (NIMS) रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी मैथिलीचे प्राण वाचवले आहेत. 


पंजागुट्टा पोलीस स्टेशनला मैथिलीच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिस मैथिलीच्या घरी पोहोचले आणि तिचा जीव वाचवला. याआधी मैथिलीने तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. मैथिलीच्या तक्रारीनंतर गुन्ह्यासह आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आले होते. 


15 दिवसात चार अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य


 बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्या आत्महत्येचे सत्र सध्या सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. जवळपास 15 दिवसांमध्येच एकूण चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे. यात पल्लवी डे, बिदिशा डे, मंजुषा नियोगी आणि सरस्वती दास यांचा समावेश आहे. 


संबंधित बातम्या


Bengali Actresses Suicide : 15 दिवसात चार अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य; नैराश्य की आणखी काही कारण?


Sidhu moose Wala : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर कंगनाचा पंजाब सरकारवर निशाणा; पोस्ट शेअर करत म्हणाली...


Kamya Punjabi : पाणीपुरीच्या स्टॉलवर एक लाख रुपये विसरली काम्या पंजाबी; नंतर घडलं असं काही...