Prajakta Mali : 'रानबाजार' (Raanbaazaar) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या बोल्ड वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने काम केल्याने तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Continues below advertisement

'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिच्या बोल्ड अवतारामुळे तिच्यावर नेटकरी टीका करत आहेत. दरम्यान प्राजक्ताने यासंपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे. 

प्राजक्ताने लिहिले आहे, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात, अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून मी हा प्रयत्न केला आहे.

Continues below advertisement

 एका दिवसात टीझरला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टीझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टीझरला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या टीझरला प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 20 मे पासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. टीझर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

'रानबाजार' वेब सीरिज संदर्भात दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणाले, "आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॉन्टेन्ट आहे. तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षयला वाटला. मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी 'रानबाजार' पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे."

संबंधित बातम्या

Raan Baazaar : 'रानबाजार'च्या टीझरला एका दिवसांत मिळाले 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

Raan Baazaar : वेब विश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार', अभिजित पानसेंच्या नवीन वेब सिरीजची घोषणा!