Kamaal Rashid Khan: अभिनेता कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरके हा त्याच्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी आणि चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनी केआरकेला जामीन मिळाला. सध्या कमाल आर खान हा ट्विटरवर वेगवेगळे ट्वीट शेअर करत आहेत. त्याच्या ट्विट्सची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नुकतच केआरकेनं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये केआरकेनं चित्रपटांचा रिव्ह्यूव न करण्यामागचे कारण सांगितले.
केआरकेच्या ट्वीटची चर्चा
केआरकेनं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते. पहिला ऑप्शन म्हणजे- मुंबई सोडून जायचा आणि दुसरा- चित्रपटांचा रिव्ह्यू करणं सोडून देणं. मी यामधील दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला. कारण बॉलीवूडमधील लोकांना मुंबईत राजकीय पाठबळ मिळते. त्यामुळे ते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात.' केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
केआरकेनं शेअर केलेल्या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. काही नेटकऱ्यांनी ट्वीटला कमेंट करुन केआरकेला दिल्लीला शिफ्ट होण्याचा सल्ला दिला. तर काही नेटकरी हे केआरकेच्या रिव्ह्यू न करण्याच्या निर्णयामुळे खुश झाले आहेत.
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं.
बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो. आता केआरके ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा रिव्हू करणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :