Kamaal Rashid Khan : कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ केआरकेला काही दिवसांपूर्वी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणी आणि चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनी केआरकेला जामीन मिळाला. सध्या कमाल आर खान हा ट्विटरवर वेगवेगळे ट्वीट शेअर करत आहेत. त्याच्या ट्विट्सची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. नुकतच केआरकेनं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये केआरकेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
केआरकेचं ट्वीट
कमाल आर खाननं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदरणीय, मोहन भागवतजी जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझी गरज असेल तर मी आरएसएसमध्ये सामील होण्यासाठी तयार आहे. ' या ट्वीटमध्ये केआरकेनं मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. केआरकेच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
केआरकेच्या या ट्वीटला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 'आरएसएसमध्ये जाण्यासाठी फक्त ट्वीट करावं लागत नाही तर नागपूरला जावं लागतं.', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे.
'मी राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नाही तर नेता असणे महत्त्वाचे आहे.' असं ट्वीट केआरकेनं काही दिवसांपूर्वी शेअर केलं होतं. केआरके खरचं राजकारणात एन्ट्री करणार आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडत आहे.
सितम,मुन्ना पांडे बेरोजगार,देशद्रोही, एक व्हिलन यांसारख्या चित्रपटांमध्ये कमाल आर खाननं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यामधील देशद्रोही या चित्रपटाची निर्मिती देखील कमालनं केली होती. 2009 मध्ये रिलीज झालेल्या बिग बॉस या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये कमाल आर खाननं सहभाग घेतला होता. हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं.
बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य कमाल करत असतो. तसेच वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांचे रिव्ह्यू देखील तो सोशल मीडियावर शेअर करतो. आता केआरके ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा रिव्हू करणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या :
Kamaal Rashid Khan : कमाल खान राजकारणात करणार एन्ट्री? म्हणाला, 'देशात सुरक्षित राहण्यासाठी ...'