मुंबई : अजय देवगनच्या 'शिवाय' चित्रपट ऑनलाईन लीक केल्यामुळे अभिनेता कमाल आर खान अडचणीत आला आहे. रिलायन्स एन्टरटेनमेंटने केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे.
'दुबईतील सिनेमा हॉलमध्ये कमाल खान 'शिवाय' चित्रपट रेकॉर्ड करुन ट्विटरवर लाईव्ह शेअर करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. हे फक्त कॉपीराईट कायद्याचंच उल्लंघन नसून सायबर लॉ अंतर्गत गुन्हा आहे.' असं रिलायन्स एन्टरटेनमेंटने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.
रिलायन्सने कमाल खान यांच्याविरोधात कायदेशीर पावलं उचलली आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अशाप्रकारची पायरसी होत असल्यास आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे.
दरम्यान, आपण चित्रपटाचं रेकॉर्डिंग केलं नसल्याचा दावा कमाल खानने केला आहे. 'शिवाय' या टायटलचा फक्त एक फोटो काढल्याचं केआरकेने म्हटलं आहे.