Kalki 2898 AD Hindi OTT Release Date & Time :  प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुप्रतिक्षीत  कल्की 2898 एडी हा चित्रपट अखेर 27 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला. आता या साफफाय चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 


कल्की 2898 एडी'  (Kalki 2898 AD) हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक एका वर्षापूर्वी सॅन डिएगो कॉमिक कॉन येथे रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. 


OTT वर 'कल्की 2898 AD' हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहता येईल?


नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा मोठा मल्टी स्टारर चित्रपट आहे. पॅन इंडिया प्रेक्षक समोर ठेवून तयार केलेल्या या चित्रपटाची जबरदस्त व्हीएफएक्स, सीजीआय  इफेक्ट्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभासचा हा चित्रपट पहिल्याच  दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई करेल असे चित्र आहे. या चित्रपटासाठी तब्बल 600 कोटींचा खर्च आला  आहे. 


कल्की 2898 एडी बाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली असताना दुसरीकडे ओटीटी रिलीजबाबत याची माहिती समोर आली आहे. कल्की 2898 एडी चित्रपटाचे हिंदीमधील व्हर्जन ओटीटीवर येणार आहे. हिंदीतील कल्की 2898 एडीचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने 175 कोटींमध्ये खरेदी केले होते.   


सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होऊ शकतो. ऑगस्टच्या अखेरीस हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  मात्र, चित्रपटाच्या OTT रिलीजची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.






पाच भाषेत रिलीज झालाय 'कल्की 2898 एडी'


'कल्की 2898 एडी' हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने UA प्रमाणपत्र दिले आहे. तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला व्हॉईस ओव्हरसोबतच चित्रपटाचा आशय काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमर देण्यात आले आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचा कालावधी 3 तास आहे.


इतर महत्त्वाची बातमी: