मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) चित्रपट काही दिवसांत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोणची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कल्की 2898 एडी चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 600 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाची चाहत्यांनी प्रतीक्षा आहे. चाहते या चित्रपटाकडे डोळे लावू बसले आहेत. या चित्रपटाची भारतातच नाही तर जगभरातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच ॲडवान्स बूकींग (Advance Booking) सुरु होताच पहिल्याच दिवशी चित्रपट नवे रेकॉर्ड रचताना दिसत आहे.


'कल्कि 2898 एडी'ची प्रदर्शित होण्याआधीच कोट्यवधींची कमाई


कल्कि 2898 हा भविष्यकालीन पौराणिक साय-फाय चित्रपट जागतिक स्तरावर वर्चस्वासाठी सज्ज आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच ऑनलाईन बुकींगमधून कोट्यवधींची कमाई करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठीच्या तिकीटांची जोरदार विक्री झाली असून 1.5 दशलक्ष डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. 


ॲडवान्स बूकींगला जगभरातून जोरदार प्रतिसाद


कल्कि 2898 चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास आणि दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. Track BO च्या माहितीनुसार, या चित्रपटाने ॲडवान्स बूकींग सुरु होताच पहिल्या दिवसासाठी ऑस्ट्रेलियामध्ये देशात 5000 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाची तिकीट विक्रीची कमाई सुमारे 83 लाख रुपये झाली आहे. चित्रपट रिलीज होण्यास 9 दिवस बाकी आहेत. 


ऑस्ट्रेलियामध्ये 5000 हून अधिक तिकीटांची विक्री


हा चित्रपट ऑस्ट्रेलियात 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, यामध्ये तेलुगू व्हर्जनसाठी सर्वाधिक तिकिटे 4779 तिकीटे आणि त्यानंतर हिंदीसाठी 216 तिकीटे विकली गेली आहेत. त्याशिवाय, 2D फॉरमॅटने 3300 पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत आणि IMAX फॉरमॅटसाठी 1000 पेक्षा जास्त तिकिटांची ॲडवान्स बूकींग करण्यात आली आहे. कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी ॲडवान्स बूकींग सध्या फक्त 53 ठिकाणी सुरु करण्यात आली असून जसजशी रिलीजची तारीखजवळ येईल तसतशी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.