मुंबई: निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने मोठी स्टारकास्ट असलेल्या आगामी ‘कलंक’ या सिनेमाची घोषणा केली आहे. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा सिनेमा 19 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाचं म्हणजे या सिनेमातून अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी तब्बल 21 वर्षांनी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात संजय, माधुरीसह सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्यरॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळेल.


1 दिग्दर्शक, 3 निर्माते

या सिनेमाचं दिग्दर्शन '2 स्टेट्स' फेम दिग्दर्शक अभिषेक वर्मन करणार आहे. तर तीन प्रोडुसर मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. यामध्ये करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन, साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टुडिओज यांचा समावेश आहे.

या सिनेमाचं शूटिंग आजपासून मुंबईत सुरु होणार आहे.

श्रीदेवीऐवजी माधुरी

श्रीदेवी यांच्या निधनामुळे या सिनेमासाठी माधुरी दीक्षितची निवड करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांना आता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

ही जोडी 1997 मध्ये म्हणजेच 21 वर्षापूर्वी शेवटची ‘महाननता’ या सिनेमात पाहायला मिळाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी दोघेही एकाच सिनेमात झळकणार आहेत.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी जय देवा (1993),  साजन (1991), खलनायक (1993), साहिबान (1993), खतरो के खिलाडी, थानेदार, इलाका, कानून अपना अपना यासारख्या अनेक चित्रपटात काम केलं आहे.