बहुचर्चित 'कलंक' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अनोख्या प्रेमकथेचा हटके अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2019 05:57 PM (IST)
या कथेत सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा)चा पती देव चौधरी (आदित्य रॉय कपूर) हा रुपशी लग्न करतो. नंतर रुप ही जफरच्या प्रेमात पडते अशी कथा आहे. माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे तर संजय दत्त ‘बलराज चौधरी’ च्या भूमिकेत आहे.
मुंबई : यंदा प्रेक्षकांना आतुरता असलेल्या 'कलंक' या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 40 च्या दशकातील ही लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट तर आहेच, मात्र सिनेमाच्या 2 मिनिटं 11 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये लोकेशन आणि भव्यतेमध्ये देखील कुठेच कमी दिसून येत नाहीये. आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसून येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन देखील दिसत आहेत. या प्रेम कथेमध्ये प्रेम, मारधाड, आयटम सॉंगसह चांगल्या गाण्यांचीही चर्चा आहे. वरुण धवन (जफर) आणि आलिया भट्ट (रुप)ची ही प्रेमकथा आहे. प्रथमदर्शनी या कथेत सत्या चौधरी (सोनाक्षी सिन्हा)चा पती देव चौधरी (आदित्य रॉय कपूर) हा रुपशी लग्न करतो. नंतर रुप देखील जफरच्या प्रेमात पडते अशी ही कथा आहे. माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे तर संजय दत्त ‘बलराज चौधरी’ च्या भूमिकेत आहे. अभिषेक वर्मन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर सिनेमाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियाडवाला, हीरु यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. पाहा चित्रपटाचा ट्रेलर