OTT Release: ओटीटीवरील (OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटीवर काही वेब सीरिज रिलीज होणार आहेत. या वेब सीरिज घरबसल्या तुमचे मनोरंजन करतील. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल जाणून घ्या...
द ट्रायल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. चाहते काजोलच्या द ट्रायल या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोर्ट रूम ड्रामावर आधारित असणारी ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही सीरिज 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये काजोल, कुब्रा सैत आणि फ्लोरा सैनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कोहरा
दोन पोलिस अधिकाऱ्यांची कथा कोहरा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. एका NRI वराचा लग्नानंतर मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचा तपास पोलीस अधिकारी करत असतात, असं कोहरा या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. कोहरा या वेब सीरिजमध्ये बरुण सोबती, हरलीन सेठी, मनीष चौधरी, सुविंदर विकी, वरुण बडोला आणि रॅचेल शेली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका 15 जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
माया बाजार ऑन सेल
नवदीप पल्लापोलू, ईशा रेब्बा, नरेश विजया कृष्णा, हरी तेजा या कलाकरांची 'माया बाजार ऑन सेल' ही तेलगू वेब सीरिज 14 जुलै रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: