Kajol On Electricity Bill: सध्या सर्वसामान्य जनताच नाही तर बॉलिवूड स्टार्सही महागाईने हैराण झाले असल्याचं चित्र आहे. कारण नुकतच बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. घराच्या विजेच्या बिलावर काजोलने यावेळी तीव्र संताप व्यक्त केला असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील केली आहे. 

माझ्या घरातील विजेचं नाही आम्ही वापरत असलेल्या सूर्यप्रकाशाचं बिल आलेलं आहे, असं काजोलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे सध्या काजोल महागाईवर व्यक्त होत आहे. दरम्यान काजोल आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हे मुंबईतील एका आलिशान बंगल्यामध्ये राहतात. या बंगल्यातील विजेच्या बिलावर काजोलने संताप व्यक्त केला आहे. 

काजोलची पोस्ट नेमकी काय?

काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हटलं की, मला माझ्या घराच्या विजेचं बिल मिळालं आहे. पण मला असं वाटतंय की, हे बिल त्यांनी मला सूर्यप्रकाशासाठी,  मोठ्या लाईट्ससाठी आणि बोगद्याच्या शेवटी असलेल्या प्रकाशासाठी दिलं आहे. काजोल आणि अजय देवगण त्यांची मुले न्यासा देवगण आणि युग यांच्यासह मुंबईतील जुहू येथे एका आलिशान बंगल्यात राहतात. त्यांच्या घराचे नाव शिवशक्ती असं आहे. या भव्य आणि आलिशान बंगल्याची किंमत 60 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

काजोल शेवटची 'दो पत्ती' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला होता ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन आणि शाहीर शेख मुख्य भूमिका साकारताना दिसल्या होत्या. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

काजोलचा वर्क फ्रंट

आता काजोलकडे 'महारागिणी' हा चित्रपट आहे. चरण तेज उप्पलापती दिग्दर्शित हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटात प्रभूदेवा देखील असणार आहे. याशिवाय ती मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनसोबत 'सरजमीन' या चित्रपटातही दिसणार आहे. कयोज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान 'सरजमीन'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

ही बातमी वाचा : 

Marathi Serial : सरकारने थापल्या तब्बल 30 भाकऱ्या, 'लय आवडतेस तू मला’ मालिकेत फुलणार नवं प्रेम