मुंबई : सुपरस्टार हृतिक रोशनच्या आगामी 'काबिल' सिनेमातलं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जबरदस्त डान्स या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.


हृतिक रोशन आणि रोनित रॉय यांच्या डायलॉगने गाण्याची सुरुवात होते आणि उर्वशीच्या डान्सने गाण्याचा समारोप होते. उर्वशीचा हा अंदाज प्रेक्षकांना अनेक दिवसांनंतर पाहायला मिळणार आहे.

हृतिकचा 'काबिल' सिनेमा जानेवारी 2017 च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संजय गुप्त यांनी केलं असून राकेश रोशन यांनी निर्माते आहेत.

पाहा गाण्याचा व्हिडिओ :