मुंबई: जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबरचा आज नवी मुंबईतल्या डी. वाय.पाटील मैदानात म्युझिक शो होणार आहे. जस्टिन बिबर मध्यरात्री मुंबई विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. 


23 वर्षीय पॉप सिंगर जस्टिन बिबरने ग्रॅमी अॅवॉर्डसर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

प्रतिष्ठित बिझनेस मॅग्झिन फोर्ब्सने जस्टिन बिबरला '30 अंडर 30' च्या यादीतही सहभागी केलं होतं. फोर्ब्सने बिबरला 2016 मध्ये सेलिब्रिटींच्या यादीत 26 वं रँकिंग दिलं होतं.

याच जस्टिन बिबरची संपत्ती किती? बिबरच्या संपत्तीचे आकडे पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील.

फोर्ब्सच्या  माहितीनुसार जस्टिन बिबरने 2016 मध्ये सुमारे 56 मिलियन डॉलर कमावले होते. म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे 362 कोटी रुपये

30 ऑल स्टार अॅल्युमनी (30-All Star Alumni) ही यादी म्हणजे 30 वर्षाखालील 30 जणांची अशी यादी, ज्यामध्ये 30 वर्षांखालील यशस्वी उद्योजक, ज्यामध्ये फायनान्स, मीडिया, संगीत, ऊर्जी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

जस्टिन बिबरने 100 जणांच्या सेलिब्रिटी यादीत 26 वं स्थान मिळवलं होतं. या यादीत पहिला नंबर टेलर स्विफ्टचा होता, त्याची कमाई 170 मिलियन डॉलर इतकी होती.

30 वर्षापेक्षा कमी वयात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत बिबरचं नाव सहाव्या नंबरवर आहे.

जगभर दौरा

नवी मुंबईतील कॉन्सर्टनंतर जस्टिन बिबर पुढचे दोन दिवस नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर जाणार आहे.

जस्टिन बिबर जगभरात कॉन्सर्ट करणार आहे. 24 सप्टेंबरला टोकियो (जपान)मध्ये त्याच्या दौऱ्याची समाप्ती होईल.

संबंधित बातम्या

जस्टिन बिबर मुंबईत दाखल, कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड

सलमानचा शेरा आता जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड!

2 फाईव्ह स्टार हॉटेल, 1 हेलिकॉप्टर, जस्टिन बिबरच्या मागण्यांची यादी