Shashi Kapoor Shabana Azmi : शबाना आझमी (Shabana Azmi) सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दर्जेदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी शबानाने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani ki Prem Kahani) या चित्रपटात धर्मेंद्रसोबत (Dharmendra) किसिंग सीन दिला होता. पण करिअरच्या सुरुवातीला इंटिमेट सीन करताना शबाना आझमी यांना घाम फुटला होता. 'हीरा और पत्थर' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन करताना जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची पत्नी शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 


झूमला दिलेल्या मुलाखतीत, शबाना आझमी यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांवर भाष्य केलं आहे. शबाना आझमी शशी कपूर यांची मोठी चाहती होती. पैसे जमवून त्या शशी कपूर यांचा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो खरेदी करत असे. तसेच प्रत्येक आठवड्यात त्या शशी कपूर यांची सहीदेखील घेत असे. 


शबाना म्हणाल्या की,"पृथ्वीराज कपूर माझा शेजारी होता. त्यावेळी शशी कपूर प्रत्येक आठवड्याला तिथे यायचा. त्यावेळी मी 9 वर्षांची होते. शशी कपूर मला एवढे आवडायचे की मी प्रत्येक आठवड्याला त्यांच्याकडे सही घ्यायला जायचे". एकवेळी अशी आली की प्रत्यक्षात शबाना आझमी यांना शशी कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पण त्यांच्यासाठी ही सोप्पी गोष्ट नव्हती. 


शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमी यांची अवस्था


शबाना म्हणाल्या,"हीरा और पत्थर' या चित्रपटासाठी मला आणि शशी कपूर यांना कास्ट करण्यात आलं होतं. माझ्यासाठी हे खूप धक्कादायक होतं. शशी कपूरची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. 'दिल में तुझे बिठाकर' या गाण्याचं रोमँटिक शूट होणार असल्याचं मला कळलं तेव्हा मी हैराण झाले होते. त्यावेळी मी खूप लहान होते. इंटिमेट सीनआधी मला घाम फुटला होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला तो शॉट द्यायचा नव्हता त्यामुळे मी सेटबाहेर पडले". 


शशी कपूर यांनी समजावलं : शबाना आझमी


शबाना आझमी म्हणाल्या,"इंटिमेट सीनसाठी नकार दिल्यानंतर शशी कपूर माझ्याजवळ आले आणि म्हणाले,तुला काय अडचण आहे? त्यावेळी मी त्यांना स्पष्ट म्हणालेले,"मी इंटिमेट सीन करू शकत नाही". माझ्या या बोलण्याने शशी कपूर नाराज झाले होते".


शबाना आझमी आणि शशी कपूर यांनी 'हीरा और पत्थर','चोर सिपाही','अतिथी' आणि 'ऊंच नीच बीच' सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Bollywood Actress : वयाच्या 72 व्या वर्षी केलं 'लिपलॉक', देवानंदच्या भाच्यासोबत होतं अफेअर; पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली 'ही' अभिनेत्री कोण?