July Upcoming Movies: या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात ‘रॉकेटरी’पासून ते ‘शाब्बास मिथू’पर्यंत अनेक बहुप्रतीक्षित चित्रपटांचा समावेश आहे. अभिनेता आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट 1 जुलै रोजी म्हणजे आजच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याने, महिन्याचा पहिला दिवसही मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. या संपूर्ण महिन्याभरात अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. चला तर, जाणून घेऊया जुलै महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी...


रॉकेटरी: द नंबी इफेक्ट


आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट जुलैच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक सन्मान पटकावले आहेत. या चित्रपटात आर. माधवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे.


राष्ट्र कवच ओम


अभिनेता आदित्य कपूर रॉयचा बहुचर्चित चित्रपट 'राष्ट्र कवच ओम' देखील 1 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. कपिल वर्मा दिग्दर्शित हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. रिलीजपूर्वीच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे.


खुदा हाफिज 2


बॉलिवूड अॅक्शन सुपरस्टार अभिनेता विद्युत जामवालचा 'खुदा हाफिज 2'  हा चित्रपट देखील याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 8 जुलै 2022 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.


शाबाश मिथू


अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर चित्रपट ‘शाबाश मिथू’ येत्या 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात तापसीने भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजची भूमिका साकारली आहे.


फोन भूत


‘फोन भूत’ हा कॉमेडी चित्रपटही 15 जुलैला प्रदर्शित होत आहे. गुरमीत सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


शमशेरा


अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.


विक्रांत रोणा


अभिनेता किच्चा सुदीपचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘विक्रांत रोणा’ 28 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटात दिसणार आहे.


एक व्हिलन रिटर्न्स


बहुप्रतीक्षित 'एक व्हिलन रिटर्न्स'ही मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 29 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि दिशा पाटणी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा :


Taarak Mehta Ka ooltah Chashmah : ‘तारक मेहता...’मध्ये ‘नट्टू काकां’ची वापसी! ‘हा’ अभिनेता साकारणार नट्टू काकांची भूमिका!


Happy Birthday Rhea Chakraborty : व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती!