Juhi Chawla, Rishi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन(Sharmaji Namkeen) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर या चित्रपटाचे शूटिंग परेश रावल (Paresh Rawal) यांनी पूर्ण केलं. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. जुहीनं या चित्रपटात ऋषी कपूर याच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे. 


एका मुलाखतीमध्ये जुहीनं सांगितलं की, 'जेव्हा आम्ही या चित्रपटाचे शूटिंग करण्यास सुरूवात केली तेव्हा मी त्यांना पाहात होते. त्यांच्या कामचे निरीक्षण मी करत होते. ते एफर्टलेस काम करत होते. ते माझ्यापेक्षा खूप वेगळे होते. मी शूटिंग दरम्यान नेहमी मॉनिटर आणि आरश्यामध्ये पाहात होते. पण ते तसं करत नव्हते.तसेच ते सारखे सेल्फी देखील काढत नव्हते. ऋषी कपूर हे शांतपणे त्यांचे काम करत होते.'






 शर्माजी नमकीन या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, परेश रावल, जुही चावला, सोहेल नैय्यर,  तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर 31 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha