Juhi Chawla On Shahrukh Khan : बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडमधील करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला चांगलीच ओळख मिळाली. जुही चावलाने  1986 मध्ये 'सल्तनत' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती.


यानंतर जुही चावलाने 1988 मध्ये 'कयामत से कयामत तक' चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. 90 च्या दशकात जुहीने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. जुही चावलाची भूमिका असलेला 'डर' चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. जुहीने नुकताच या चित्रपटातील 'क-क-किरण'हा डायलॉग चांगलाच गाजला. या डायलॉगशी संबंधित एक किस्सा जुहीने सांगितला. 


जुही चावलाने सांगितला 'डर'शी संबंधित किस्सा


जुही चावलाने नुकतीच गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी तिने 'डर' चित्रपटातील 'क-क-किरण'हा डायलॉगचा चांगलाच प्रसिद्ध धाला होता. या चित्रपटात शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. शाहरुखने अडखळत डायलॉग म्हटला होता. शाहरुखच्या या अडखळण्याचे कारण यश चोप्रा होते.


जुही चावलाने सांगितले की, यश चोप्रा यांना अडखळत बोलण्याची सवय होती. यश चोप्रा यांची ही सवय शाहरुखच्या लक्षात आली.त्यानंतर शूटिंगच्या दरम्यान शाहरुखने यश चोप्रांना तुमची ही बोलण्याची सवय मला या व्यक्तीरेखेसाठी वापरायची आहे असे सांगितले. शाहरुखने क-क-किरण हा डायलॉग शूट केला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला. 


शाहरुख-जुहीच्या जोडीला पसंती...


 






शाहरुख खान आणि काजोलची जोडी बॉलिवूडमध्ये हिट ठरली आहे. त्याशिवाय, शाहरुख आणि जुही चावला यांची जोडी देखील चांगलीच लोकप्रिय ठरली होती.  'डर' व्यतिरिक्त शाहरुख आणि जुहीने 'राजू बन गया जेंटलमॅन', 'राम जाने', 'येस बॉस', 'डुप्लिकेट', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' आणि 'वन 2 का 4' मध्येही काम केले होते. जुही चावला ही मागील काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 'द रेल्वे मॅन' या वेब सीरिजमध्ये  जुही झळकली होती. 


इतर संबंधित बातमी :


Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस