Modonna : हॉलिवूडची पॉप स्टार मॅडोना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या संगीतासोबतच ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे 18 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. याचाच अर्थ सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण आता मॅडोना आणि तिच्या चाहत्यांनाही मोठा झटका बसला आहे. इंस्टाग्रामने मॅडोनाला लाईव्ह जाण्यास बंदी घातली आहे.
मॅडोनाने केलं इंस्टाग्रामच्या तत्त्वांचं उल्लंघन
मॅडोनाने इंस्टाग्रामच्या तत्त्वांचे उल्लंघन केलं आहे. मॅडोना इंस्टाग्रामवर सतत तिचे न्यूड फोटो शेअर करत होती. मॅडोना लाईव्ह करत असतानाच तिला लाईव्ह जाण्सास बंदी घालण्यात आली. मॅडोनाने चाहत्यांच्या भावनांचा आदर करावा. तसेच कायद्याचे पालन करावे, असे इंस्टाग्रामकडून सांगण्यात आले आहे.
इंस्टाग्रामने मॅडोनाला पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, "इंस्टाग्राम हे अभिव्यक्तीसाठीचे एक सुरक्षित माध्यम आहे. इंस्टाग्रामवर फक्त तुमचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करा. फोटो-व्हिडीओ पोस्ट करताना कायद्याचे पालन करावे. न्यूड फोटो पोस्ट करू नयेत". याआधीदेखील मॅडोनाने इंस्टाग्रामवर अनेकदा अश्लील फोटो पोस्ट केले आहेत. आता हे फोटो इंस्टाग्रामने डिलीट केले आहेत.
मॅडोना म्हणाली, आपण अशा समाजात राहतो ज्या समाजात एखादी स्त्री तिचे संपूर्ण शरीर दाखवू शकते. पण स्तन नाही. मी माझे पुन्हा फोटो पोस्ट करत आहे. कारण इंस्टाग्राम कोणत्याही सूचनेशिवाय माझे पोटो काढू शकत नाही. मॅडोनाने लोकांच्या भावनांचा आदर करावा. आणि कायद्याचे पालन करावे, अशी इंस्टाग्रामने म्हटले आहे.
संबंधित बातम्या