Jug Jugg Jeeyo Box Office Collection : 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आहे. या सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकलेला नाही. कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे. 


'जुग जुग जिओ'ने केली 9.28 कोटींची कमाई


'जुग जुग जिओ' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 9.28 कोटींची कमाई केली आहे. पण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठियावाडी', 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'भूल भुलैया 2' या सिनेमांच्या कमाईच्या बाबतीत 'जुग जुग जिओ' मागे पडला आहे. कारण या सिनेमांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.50 कोटी, 13.25, 10.25 आणि 14.11 कोटींची कमाई केली होती. तर दुसरीकडे 'केजीएफ 2'ने 53.95 कोटी तर आरआरआर' या सिनेमाने 20.07 कोटींचा गल्ला रिलीजच्या पहिल्या दिवशी जमवला होता. 


'जुग जुग जिओ' हा सिनेमा आता रिलीज झाल्याने सोशल मीडियावर हा सिनेमा चर्चेत आहे. काही मंडळींना हा सिनेमा आवडत नसून काहींच्या मात्र पसंतीस उतरत आहे. तरण आदर्शने या सिनेमाला चार रेटिंग दिली आहे. त्यामुळे विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो. 






कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसत आहेत. 


नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे. 


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya : वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर... 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार 'जुग जुग जिओ' सिनेमातील कलाकार


Jug Jugg Jeeyo Review : नात्यांची गुंफण जपणारा...'जुग जुग जिओ'