Jr NTR : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आजच्या घडीला चांगलाच लोकप्रिय आहे. फक्त साऊथच नव्हे तर जगभरात तो चांगलाच लोकप्रिय आहे. ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव नंदमुरी तारक रामा राव ज्युनिअर असं आहे. अभिनेता आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. ज्युनिअर एनटीआरचा जन्म 20 मे 1983 रोजी हैदराबादमध्ये झाला. ज्युनिअर एनटीआरचा जन्म एका रॉयल घराण्यात झाला असला तरी सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आयुष्यात एकेकाळी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.
ज्युनिअर एनटीआर हा तेलुगू स्टार आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन टी रावा राव यांचा तो नातू आहे. अभिनेत्याला चाहते प्रेमाणे तारक म्हणतात. ज्युनिअर एनटीआरने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 8 व्या वर्षी केली आहे. बालकलाकार म्हणून 1991 मध्ये आलेल्या 'ब्रह्मऋषी विश्वमित्र' या चित्रपटाच्या माध्यमातचून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तारकने राज भरतची भूमिका साकारली होती. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी तो श्रीरामाच्या भूमिकेत झळकला. 1997 मध्ये त्याने 'रामायणम्' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातील कामासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ज्युनिअर एनटीआरला वयाच्या 18 व्या वर्षी 2001 मध्ये 'निन्नु चूडालानी' या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक मिळाला.
लठ्ठ आणि दिसण्यावरुन कुरूप म्हणून अवहेलना
ज्युनिअर एनटीआरने सिनेसृष्टीत करिअर करायला सुरुवात केली तेव्हा लठ्ठपणा आणि दिसण्यावरुन कुरुप म्हणून त्याची अवहेलना करण्यात आली. त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'राखी' या 2006 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटासाठी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यावेळी त्याचं वजन 100 किलो होतं. पुढे 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'लोक परलोक' चित्रपटासाठी त्याने 20 किलो वजन कमी केलं.
राजामौलीने दिला पहिला हिट
ज्युनिअर एनटीआरला पहिला हिट चित्रपट देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून राजामौली आहे. दोघांनी 2001 मध्ये पहिला एकत्र चित्रपट केला. 'स्टूडंट नंबर 1' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. राजामौलीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पुढे आणखी तीन चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. यात 'मिम्हाद्री','लोक-परलोक' आणि 'RRR' या तीन चित्रपटांचा समावेश आहे. 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'आदि' आणि 'सिम्हाद्री' या चित्रपटाच्या यशाने ज्युनिअर एनटीआर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.
ज्युनिअर एनटीआर कोट्यवधींचा मालक
ज्युनिअर एनटीआरची एकूण संपत्ती 450 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अभिनेत्याचं हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. तसेच हैदराबादमध्ये एक फार्महाऊस, मुंबई आणि बंगळुरूमध्ये एक घर आहे. ज्युनिअर एनटीआरला गाड्यांचीदेखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी 50-60 कोटी रुपयांचं मानधन घेतो. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ज्युनिअर एनटीआरचा समावेश होतो.
ज्युनिअरचा 'देवरा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Jr NTR Upcoming Movie)
ज्युनिअर एनटीआरचा 'देवरा' (Devra) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर पहिल्यांदाच अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या