मुंबई : सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘जॉली एलएलबी-2’ चा मेकिंग व्हिडिओ रिलीज झाला आहे. या सिनेमातील मुख्य पात्र जॉली कसा तयार झाला, शिवाय खिलाडी अक्षय कुमार वकील कसा बनला, ते या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
अक्षय कुमारनेही सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याविषयी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ‘जॉली एलएलबी-2’ हा 2013 सालच्या ‘जॉली एलएलबी’ या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल आहे.
‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या भागात अभिनेता अरशद वारसी आणि बोमन इराणी यांची मुख्य भूमिका होती. तर या सिनेमात अक्षय कुमार दिसेल. 10 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा देशभरात रिलीज होणार आहे.
पाहा व्हिडिओ :