मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 2’ ने 12 व्या दिवशीच 100 कोटींचा आकडा पार केला आहे. मंगळवारी म्हणजेच 12 दिवशी 2.45 कोटींची कमाई करत या सिनेमाने 100.37 कोटींची कमाई केली आणि 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. दररोजची कमाई
  1. पहिल्या दिवशी 13.20 कोटी
  2. दुसऱ्या दिवशी 17.31 कोटी
  3. तिसऱ्या दिवशी 19.95 कोटी
  4. चौथ्या दिवशी 7.26 कोटी
  5. पाचव्या दिवशी 9.7 कोटी
  6. सहाव्या दिवशी 5.89 कोटी
  7. सातव्या दिवशी 5.3 कोटी
  8. आठव्या दिवशी 4.14 कोटी
  9. नवव्या दिवशी 6.35 कोटी
  10. दहाव्या दिवशी 7.24 कोटी
  11. अकराव्या दिवशी 2.48 कोटी
  12. आणि बाराव्या दिवशी 2.45 कोटी
13 महिन्यात 4 सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये गेल्या 13 महिन्यात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा अक्षय कुमारचा हा सलग चौथा सिनेमा ठरला आहे. अक्षय कुमारने हा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी ‘एअरलिफ्ट’ (128.1 कोटी ), ‘हाऊसफुल 3’ (109.14 कोटी), ‘रुस्तम’ (127.49 कोटी) या सिनेमांनी 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. 2013 सालच्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा ‘जॉली एलएलबी 2’ हा सिक्वेल सिनेमा आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या सिनेमात अक्षय कुमारसह अभिनेत्री हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, अन्नू कपूर यांचीही मुख्य भूमिका आहे. अक्षय कुमार यानंतर ‘नाम शबाना’ आणि ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. VIDEO : 'नाम शबाना'चा ट्रेलर