कल्याण : अभिनेता अनिल कपूरची नक्कल करत त्याच्याप्रमाणे लोकलमध्ये स्टंटबाजी करु नका, असं आवाहन बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने केलंय. आम्ही कलाकारांनी केलेले साहसी स्टंट नागरिकांनी करु नयेत, असा सल्ला जॉनने दिला.


 
देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थी मोठी भूमिका बजावू शकतात असा विश्वासही जॉननं व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना गळ घातली तर भ्रष्टाचार नक्कीच थांबेल असं मत जॉननं व्यक्त केलं.

 
जॉन एका कार्यक्रमानिमित्त कल्याण-मुरबाड रोडवरील सॅक्रेड हार्ट शाळेमध्ये आला होता.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी गरिबांच्या घरासाठी निधी जमा केलाय. या उपक्रमाचं जॉन अब्राहमनं कौतुक केलंय.