Me Vasantrao : जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी सिनेमा 'मी वसंतराव' (Me Vasantrao) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 1 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन निपुन धर्माधिकारीने केले आहे. 


सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे. राहुल देशपांडे व्यतिरिक्त सिनेमात अनिता दाते, अमेय वाघ,पुष्करराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंतरावांनी त्यांच्या गायनाने अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केले आहे.





'मी वसंतराव' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण आता लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये वसंतरावांचे विचार, संगीतावरचं प्रेम आणि प्रत्येकवेळी घेतलेली खंबीर भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला होता. 


चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणतात, ''मी वसंतराव' या चित्रपटावर आम्ही गेले ९ वर्षं काम केले आहे आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याचा नक्कीच आनंद आहे. मात्र एखाद्या महान व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर दाखवणे ही नक्कीच सोपी प्रक्रिया नाही. हे आव्हानात्मक काम आहे. पण यात तो काळ, व्यकितमत्वाचे पैलू, निर्मिती प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे संगीत, हे सर्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले आहेत. आणि वसंतरावांची भूमिका त्यांचे नातू राहुल देशपांडे यांनीच साकारली असल्याने ही खूप मोठी जमेची बाजू ठरली आहे. मला खात्री आहे की जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात याचा अनुभव घेतील त्यांना या सगळ्या कलात्मकबाबींची प्रचिती येईल".


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समावेश
- गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2021 मध्ये 'मी वसंतराव' या सिनेमाची निवड झाली. 
-  आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेलेल्या 'कान्स' चित्रपट महोत्सवातही सिनेमाची निवड झाली होती.


संबंधित बातम्या


Brahmanandam : सुपरस्टारहून कमी नाही कॉमेडियन ब्रह्मानंदम, एका सिनेमासाठी घेतात कोटी रुपये


Shabana Azmi Corona Positive : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती


Jhimma Marathi Movie : 'झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी; प्रेक्षकांची जिंकली मनं


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha