Jhimma 2 Trailer 'झिम्मा-2' (Jhimma-2)  या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर  रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


कलाकारांचा लक्षवेधी अभिनय (Jhimma 2 Trailer Out)


झिम्मा-2  या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांच्या एका सीनने होते. या सीनमध्ये दिसत आहे की, निर्मिती सावंत  या कार चालवत आहेत, तितक्यात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटते. त्यानंतर ट्रेलरमध्ये झिम्मा-2 या चित्रपटामधील एक-एक भूमिकांची माहिती देण्यात आली आहे. ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं लक्ष वेधले आहे.


जबरदस्त डायलॉग्स


झिम्मा-2  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महिलांसंबंधित काही डायलॉग्स आहेत. "फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं", या झिम्मा-2  या चित्रपटाच्या ट्रेलरमधील निर्मिती सावंत यांच्या डायलॉगनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 


सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केला ट्रेलर


सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा-2  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, "त्या देऊन धडक आल्यात तडक… होऊन मोकाट आता!त्या सोडून फिअर टाकून गिअर झाल्यात सुसाट आता! सादर आहे आपल्या झिम्मा 2 चा ट्रेलर!धुड्डूऽऽऽम!   24 नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…" 







रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वेची 'झिम्मा' टीममध्ये एन्ट्री


झिम्मा या चित्रपटात  सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव, मृण्मयी गोडबोले  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. पण आता झिम्मा-2 चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले या दोघी दिसत नाहीत. पण झिम्मा-2 चित्रपटात रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोघी महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. 24 नोव्हेंबर  रोजी झिम्मा-2  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Jhimma 2: "पुन्हा खेळूया नवा खेळ, सोबत नव्या नात्यांचा मेळ"; झिम्मा-2 चा जबरदस्त टीझर रिलीज