Janhvi Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) 'गुडलक जेरी' (Goodluck Jerry) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता.  जान्हवीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवी सध्या तिच्या 'बवाल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेक वेळा जान्हवी कपूरला स्टारकिड असल्यानं ट्रोल केलं जातं. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं तिच्या कुटुंबासोबत एक चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. 


एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं सांगितलं की, तिच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती कामामध्ये व्यस्त आहेत. खुशी कपूर आणि अर्जुन कपूर हे काम करत आहेत तर ती स्वत: तिच्या 'गुडलक जेरी'  या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कामात व्यस्त असल्यानं जान्हवी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे जान्हवीनं कुटुंबासोबत चित्रपट तयार करायची इच्छा व्यक्त केली. या चित्रपटामध्ये जान्हवी तिच्या पूर्ण कुटुंबाला कास्ट करणार आहे, असंही तिनं सांगितलं. 


हे असेल चित्रपटाचं नाव
कुटुंबासोबत तयार केलेल्या चित्रपटाचं नाव 'नेपोटिजम' असेल असं जान्हवीनं सांगितलं. अनेक वेळा जान्हवी आणि खुशीला  'नेपोटिजम' वरुन ट्रोल देखील केलं जातं. 


जान्हवी कपूरचा ‘गुड लक जेरी’या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसोबतच दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. जान्हवीची बहिण खुशी कपूरचा  'द आर्चीज' नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात  सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर हे  कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं खुशीच्या स्ट्रगलबाबत सांगितलं,''द आर्चीज' या चित्रपटात काम मिळवण्यासाठी खुशी आणि सुहाना यांना मेहतन करावी लागली. तिनं दोन-तीन वेळा ऑडिशन्स दिल्या. तसेच तिनं काही वर्कशॉप्स देखील केले. मला आठवत नाही मी खुशीसोबत जास्त वेळ कधी घालवला. कारण ती सकाळी 4-5 वाजता निघून जाते.' 


हेही वाचा: