हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2017 11:46 PM (IST)
चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे.
मुंबई : हिंदी सैराटचं कास्टिंग झालं असून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले. सैराटच्या यशाने फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली. बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने सैराटचे अधिकृत हक्क विकत घेतले असून लवकरच तो सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मराठी सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारलेली आर्ची प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली होती. तिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही मोहर उमटवली होती. तर आकाश ठोसरने परशाची व्यक्तिरेखा गाजवली होती. सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात हिंदी सैराटचं शूटिंग सुरु होणार आहे. हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.