'देवसेना' अनुष्काचा 'भागमती' चित्रपटातील फर्स्ट लूक
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2017 07:38 PM (IST)
7 नोव्हेंबर रोजी अनुष्का शेट्टीचा वाढदिवस आहे. हे निमित्त साधत आदल्या दिवशी तिचा लूक सादर करण्यात आला.
मुंबई : देवसेनेच्या व्यक्तिरेखेमुळे अक्षरशः घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या आगामी चित्रपटातील लूक रीव्हिल करण्यात आला आहे. अनुष्काच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'भागमती' चित्रपटातील अनुष्काचा लूक लाँच करण्यात आला आहे. उद्या म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी अनुष्का शेट्टीचा 36 वा वाढदिवस आहे. हे निमित्त साधत आदल्या दिवशी तिचा लूक चाहत्यांसमोर सादर करण्यात आला. भागमतीमध्ये अनुष्का मुख्य भूमिका साकारत आहे. फर्स्ट लूकमध्ये अनुष्काच्या हात, चेहराभर जखमा झालेल्या दिसत आहेत. तिचा हात खिळ्याने भिंतीवर ठोकण्यात आल्यासारखं दिसत आहे. तिच्या दुसऱ्या हातात हातोडा आहे. https://twitter.com/UV_Creations/status/927512186468974592 जी अशोक यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अनुष्कासोबत उन्नी मुकुंदन दिसणार आहे.