नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता आहे.
जया बच्चन 2004 मध्ये समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. सध्या त्या तिसऱ्यांदा खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत. जया बच्चन यांची तिसरी टर्म 3 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे.
तृणमूलकडून खासदारकीच्या उमेदवारांमध्ये जया बच्चन यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अंतिम निर्णयानंतर जया बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 18 मार्च रोजी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
बंगालशी जया बच्चन यांचं असलेलं नातं आणि राज्यातील लोकप्रियता पाहता त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.
एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 10 जागांचा समावेश आहे. भाजपला याचा फायदा होण्याचा अंदाज आहे.