Shah Rukh Khan Jawan Starcast Fees : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा प्रीव्यू आऊट झाला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमातील किंग खानचे वेगवेगळे लूक ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.


'जवान' या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. तर नयनतारा (Nayanthara), प्रियामणी, विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमातील स्टारकास्टच्या मानधनाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. 


'जवान' सिनेमासाठी शाहरुखने किती मानधन घेतलं आहे? (Shah Rukh Khan Jawan Fees)


शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षीत सिनेमांत 'जवान' या सिनेमाचा समावेश आहे. त्याचा हा बिग बजेट सिनेमा असून या सिनेमात तो दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. किंग खानने या सिनेमासाठी 100 कोटी रुपये घेतले असल्याचं समोर आलं आहे.


नयनतारा (Nayanthara) : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने 'जवान' या सिनेमासाठी आठ ते अकरा कोटी रुपये आकारले आहेत. 


प्रियामणी (Priyamani) : अभिनेत्री प्रियामणीने 'जवान' सिनेमासाठी दोन कोटी रुपये आकारले आहेत. 


विजय सेतुपती (Vijay Sethupathi) : 'जवान' या सिनेमात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी त्याने 21 कोटी रुपये आकारले आहेत. 


सुनील ग्रोवर (Sunil Grover) : 'जवान'च्या प्रीव्यूमध्ये सुनील ग्रोवरची झलक दिसून आली असून या सिनेमासाठी त्याने 75 लाख रुपये घेतले आहेत. 


सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) : अभिनेत्री सान्या मल्होत्राने 'जवान' या सिनेमासाठी दोन कोटी रुपये घेतले आहेत. 


योगी बाबू (Yogi Babu) : 'जवान' सिनेमासाठी योगी बाबूने 50 लाख रुपये आकारले आहेत. 


'जवान' (Jawan) सिनेमासाठी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेने (Girija Oak) आणि दीपिका पदुकोनने (Deepika Padukone) किती मानधन घेतलं हे अद्याप समोर आलेलं नाही. 


'जवान' ओपनिंग डेला किती कमाई करणार? (Jawan Opning Day Collection)


'जवान' या सिनेमाची निर्मिती 220 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. केआरकेने ट्वीट करत 'जवान' सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याबद्दल सांगितलं आहे. त्याने लिहिलं आहे,"जवान' हा बिग बजेट सिनेमा असेल. या सिनेमाला थोडा दाक्षिणात्य टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिनेमात 80% वीएफएक्स असले. एटलीने दाक्षिणात्य सिनेमांप्रमाणे बॉलिवूडमध्ये एक उत्तम मसालापट बनवला आहे. हा सिनेमा ओपनिंग डेला 50 कोटींची कमाई करू शकतो. 






संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट