मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील वाद संपता संपत नसून दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कंगना सहकार्य करत नसून तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावं, अशी मागणी करणारा अर्ज जावेद अख्तर यांच्यावतीनं सोमवारी अंधेरीच्या महानगरदंडाधिरी न्यायालयात दाखल केला गेला आहे.


एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांच्याविरोधात काही विधानं केली होती. कंगनाची बहिण रंगोली चंदेलनंदेखील याला दुजोरा देत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट लिहिल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून आपली नाहक बदनामी होत आहे, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर मार्ग स्विकारत मानहानीचा खटला दाखल आहे. 


मार्च 2021 पासून या खटल्यादरम्यान कंगनानं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सूट मागितली आहे. 20 सप्टेंबर रोजी कंगना याप्रकरणी कोर्टात हजर झाली होती. अंधेरी महानगरदंडाधिकारी न्यायालयात या खटल्यास सुरुवात झाल्यापासून कंगना जाणूनबूजून विलंब करत आहे. तिच्या वर्तनावरूनच हे अधोरेखित होत असून ती अत्यंत चुकीची आणि खोटी विधानं करत असल्याचा दावाही अख्तर यांनी आपल्या अर्जातून केला आहे. या खटल्यावर 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या सुनावणीत कंगनानं ताप आणि अंगदुखीचं कारण पुढे केलं होतं. 


आजारी असल्याचा दावा करणाऱ्या कंगनाने त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया अकाऊंटवर ती चित्रपटाचे चित्राकरण करत असल्याचे फोटो टाकले होते. त्यामुळे या खटल्यास विलंब व्हावा, यासाठी कंगना वारंवार कोर्टात गैरहजर राहत असून तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावे अशी मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी 4 जानेवारीपर्यंत तहकूब केली.


संबंधित बातम्या


इन्स्टाग्राम पोस्टप्रकरणी गुन्हा रद्द करा, कंगनाची हायकोर्टात धाव


Kangana Ranaut's Social Media Post on Farmers : 25 जानेवारीपर्यंत कंगनाला दिलासा; कठोर कारवाई करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही


Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha