Jailer Actor Death: अभिनेते जी मारीमुथू (G Marimuthu) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजनीकांत (Rajinikanth) यांच्या 'जेलर' (Jailer) या ब्लॉकबस्टर चित्रपटमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
'इथर्नीचल'या टीव्ही शोचे डबिंग करताना जी मारीमुथू हे कोसळली. त्यावेळी जी मारीमुथू यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. 'जेलर' आणि 'रेड सँडलवुड' या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. मारीमुथू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
रमेश बाला यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "धक्कादायक लोकप्रिय तमिळ अभिनेते मारीमुथू यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या टीव्ही मालिकेंमधील डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.'
मरीमुथू यांनी मणिरत्नम, वसंत, सीमा आणि एसजे सूर्या यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. एसजे सूर्यासोबतचा त्यांचा पहिला चित्रपट 'वाली' होता.
त्यांनी 'पुलिवाल' आणि 'कन्नम कन्नम' या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले.
अभिनेत्री रडिका सरथकुमारनं ट्वीट शेअर करुन जी मारीमुथू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मरिमुथू यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झालं आणि धक्का बसला आहे, ते एक टॅलेंटेड व्यक्ती होते.'
मारीमुथू हे तमिळ चित्रपटसृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक होते. 2008 मध्ये आलेल्या 'कन्नम कन्नम' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. या चित्रपटात प्रसन्न आणि उदयथारा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
संबंधित बातम्या:
Malini Rajurkar: संगीत क्षेत्रावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन