मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या ‘शून्यता’ या शॉर्ट फिल्मचा अमेरिकेत गौरव करण्यात आला. लॉस एंजेलिसमध्ये बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्काराने गौरवण्यात आले. चिंतन सारदा यांना ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित, तर सुनील खेडेकर यांची निर्मिती आहे.


चिंतन सारदा यांनी दिग्दर्शित केलेली 22 मिनिटांची शॉर्ट फिल्म हजारो एन्ट्रीजमधून टॉप-6 मध्ये निवडली गेली होती. लॉस एंजेलिसमधील थिएटरमध्ये या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर परीक्षकांनी बेस्ट फिल्म म्हणून ‘शून्यता’ची निवड केली.  

3 मार्च रोजी मॅख सेनेट स्टुडिओमध्ये पुरस्कार सोहळ्याच्या समारंभाचं आयोजन करण्यात आले होते. एक हजार डॉलरसह सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

“आमची शॉर्ट फिल्म या फेस्टिव्हलमध्ये दाखवली गेली, हाच मोठा सन्मान आहे. जॅकी सर आणि इतर सर्वच कलाकरांचे मी मनापासून आभारी आहे.”, असे दिग्दर्शक चिंतन सारदा म्हणाले.

सारदा पुढे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून शून्यता शॉर्ट फिल्मवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यामुळे नक्कीच आनंद होत आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.”

पाहा 'शून्यता' :