अभिनेत्री मेघना नायडूचं घर लुटणाऱ्या दाम्पत्याला बेड्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2018 01:11 PM (IST)
गोव्यातील कलंगुट पोलिसांनी प्रिन्सराज चवीराज आणि शर्मिल दलाल यांना अटक केली आहे
पणजी : 'हवस' चित्रपट आणि 'कलियोंका चमन' सारख्या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मेघना नायडूच्या घरात चोरी करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेघनाच्या गोव्यातील बंगल्यात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातील लहान-सहान गोष्टीही चोरुन पोबारा केला होता. गोव्यातील कलंगुट पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. 32 वर्षीय प्रिन्सराज चवीराज आणि 32 वर्षीय शर्मिल दलाल यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मेघनाच्या घरातील केअरटेकर सुहासिनी राऊतला या दोघांनी सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला होता. मुलांना नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्यांनी वेळोवेळी पैसे उकळले होते. राऊत यांनी 26 फेब्रुवारी रोजी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.