Ayesha Shroff: अभिनेता जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) पत्नी आयशा श्रॉफने (Ayesha Shroff) सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आयेश श्रॉफनं दावा केला आहे की, तिची 58.53 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अॅलन फर्नांडिस याच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 408, 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अॅलन फर्नांडिस याची एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी डायरेक्टर ऑफ ऑपरेषन म्हणून नियुक्ती केली गेली होती. एमएमए मट्रीक्स जीम हे टायगर श्रॉफचे (Tiger Shroff) असून तो चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा ही तेथील सर्व कामकाज पाहत होती. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अॅलन फर्नांडिस यास एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये येणाऱ्या लोकांना मार्षल आर्टचे प्रशिक्षण देण्याकरीता  3 लाख रुपये मासिक वेतन देऊन नोकरीवर ठेवले होते.


पोलिसांनी सांगितले कि, अॅलन फर्नांडिस याने एमएमए मट्रीक्स कंपनीतर्फे भारतात आणि भारताबाहेर अशा एकूण 11 स्पर्धा  आयोजन करण्याकरीता ज्यादा रक्कम घेतली तसेच जीममधील मार्षल आर्टचे शिक्षण घेत असलेल्या लोकांची डिसेंबर  2018 ते जानेवारी 2023 पर्यंत जमा झालेली फी ची एकूण रक्कम 58.53,591 रुपये ही कंपनीच्या बँक खातेमध्ये न भरता ती स्वतःचे आयसीआयसीआय बँकेतील खातेमध्ये ठेवली. तसेच काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन कंपनीचा विश्वासघात करून फसवणुक केली.


त्याच बरोबर एमएमए मट्रीक्स कंपनीचे  बनावट लेटर हेड तयार करून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला म्हणून त्याचा विरुद्ध कायदेशीर करवाई करण्यात आली आहे. 






आयेशा श्रॉफ या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करतात. आयेशा श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. टायगर हा त्याच्या फिटनेसमुळे आणि चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. टायगरचा चाहता वर्ग मोठा आहे. टायगरनं हिरोपंती या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


 'बॉलिवूडच्या भिडू'वर आलेली चाळीत राहण्याची वेळ; जाणून घ्या जॅकी श्रॉफच्या संघर्षाची कहाणी...