नवी दिल्लीः सिनेमा निर्माता करण जोहरने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'स्टुडेंट ऑफ दी इयर' सिनेमाच्या सिक्वलबाबत मौन सोडत मोठी घोषणा केली आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं करण जोहरने जाहीर केलं आहे.


 

करण जोहरने इट्स ऑफिशिअल असं सांगत या सिनेमाचं दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच करण जोहरने सिनेमाचा लोगोही शेअर केला आहे. मात्र टायगरसोबत या सिनेमात कोणती अभिनेत्री असणार याबाबत विविध अंदाज लावले जात आहेत.

 

टायगरसोबत कोण दिसणार?

 

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी यांची नावं सध्या चर्चेत आहेत. यापैकीच एक जण सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा आहे.

https://twitter.com/karanjohar/status/765023947863777280

करण जोहरने 2012 साली 'स्टुडेंट ऑफ दी इयर' सिनेमातून एकाच वेळी तीन कलाकारांना बॉलिवूड पदार्पणाची संधी दिली होती. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत सिनेमाला मोठं यश मिळवून दिलं होतं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वलबाबत विविध अफवा पसरवल्या जात होत्या. अखेर करण जोहरनेच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.