सुशांत राजपूत म्हणतो, मी कोट्यवधी रुपये कमवू शकतो पण...
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2016 09:34 AM (IST)
मुंबई: टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सारे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. त्याच्या अभिनयाचेही साऱ्यांनी कौतुक केले आहे. पण सुशांतने आपल्या मनातील एक खंत नुकतीच बोलून दाखवली आहे. सुशांत म्हणतो की, मी कोट्यवधी रुपये सहज कमवू शकतो पण आत्मविश्वास कमावणे आवघड असते. सुशांतने आपल्या ट्विटच्या माध्यमातून आपली ही भावना व्यक्त केली आहे. सुशांतची मुख्य भूमिका असलेल्या 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या सिनेमात कायरा आडवाणी, दिशा पटनी, अनुपम खेर आदी मुख्य भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे.