Ishaan Khatter Hollywood Debut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) भाऊ ईशान खट्टर (Ishaan Khatter) लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ईशानला निकोल किडमॅन आणि लिव्ह श्रेबर यांच्यासोबत 'द परफेक्ट कपल' या प्रोजेक्टमध्ये कास्ट करण्यात आले आहे. ईशाननं त्याच्या या नव्या हॉलिवूड प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.


ईशानला काही महिन्यांपूर्वी या हॉलिवूड सीरिजची ऑफर आली. ही सीरिज एलिन हिल्डरब्रँडच्या 'द परफेक्ट कपल' या कादंबरीवर आधारित आहे. ईशान खट्टरने त्याच्या  'द परफेक्ट कपल' या प्रोजेक्टबाबत सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली. ईशानच्या या पोस्टला कमेंट करुन त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. 


अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनेही "क्या बात है" अशी कमेंट करुन ईशानचे अभिनंदन केले. तर गायक अरमान मलिकने ईशानच्या पोस्टला कमेंट केली, "खूप अभिनंदन भावा."शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने देखील कमेंट करुन ईशानला शुभेच्छा दिल्या. तान्या माणिकतला, सयानी गुप्ता, दिया मिर्झा, प्रियांशू पानिउली, रसिका दुगल यांनी देखील ईशानचे अभिनंदन केले आहे.






'द परफेक्ट कपल' या  हॉलिवूड सीरिजमध्ये ईशान हा  शूटर दिवाल ही भूमिका साकारत आहे. जो नवरदेवाच्या मित्र असतो. बिली हॉवेल हा नवदेवाची भूमिका साकारत आहे.  Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज स्ट्रीम करण्यात येणार आहे. ईशान आणि बिली हॉवेल यांच्या व्यतिरिक्त निकोल किडमॅन, मेघन फाहे, इसाबेल अदजानी आणि डकोटा फॅनिंग हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


ईशाननं धडक या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं. त्याच्या 'फुरसत' या शॉर्ट फिल्ममधील कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. आता त्याच्या हॉलिवूडमधील 'द परफेक्ट कपल' या प्रोजेक्टची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.





वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ishaan Khatter: शाहिदच्या पत्नीनं ईशान खट्टरच्या लगावली कानशिलात; व्हिडीओ व्हायरल