Sheezan Khan: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिझानला जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझाननं सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर केल्या. आता शिझाननं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं तुनिषा शर्माच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शिझानच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
शिझानची पोस्ट
शिझाननं तुनिषा शर्मासोबतच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि तुनिषा हे ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर मस्ती करताना दिसत आहेत.व्हिडीओला शिझाननं खास कॅप्शन देखील दिलं आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं कविता लिहिली आहे. 'एक परी उतरी फलक से शफक की लाली लिए,कहकशा ज़ैसी उसकी आँखें गजब की अदाएं लिए' असं कॅप्शन शिझाननं या पोस्टला दिलं आहे.
शिझाननं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला 'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येला अभिनेता शिझान खान जबाबदार आहे, असा आरोप शिझानवर करण्यात आला. पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
कोण आहे शिझान खान?
शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. शिझान हा अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) आणि 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. तुनिषा सोशल मीडियावर देखील सक्रिय होती. ती विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Tunisha Sharma: 'तुझी आठवण येते...'; तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट