इशा अंबानीच्या लग्नाला अवघं बॉलिवूड अवतरलं
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2018 08:09 PM (IST)
उद्योगपती मुकेश अंबानी इशा हिच्या लग्नसोहळ्यासाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज मुंबईतील त्यांच्या अॅन्टालिया या राहत्या घरी पार पडला. इशा अंबानी ही आनंद पिरामलसोबत विवाहबंधनात अडकली आहे. इशा-आनंदच्या लग्नसोहळ्यासाठी अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. बिग बी अमिताभ बच्चन मुलगी श्वेता नंदासोबत, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह, अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसह उपस्थित होते. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. बिग बीनंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन हे दोघे मुलगी आराध्यासोबत लग्नासाठी उपस्थित होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, गीतकार प्रसून जोशी, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन, कियारा अडवाणी, निक जोनास, प्रियंका चोप्रा, हरभजन सिंग, गीता बसरा, विधु विनोद चोप्रा, अनुपमा चोप्रा, वैभवी मर्चंट यांनीदेखील या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. इशा आणि आनंद यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. इशाचा भाऊन अनंत अंबानीने घोड्यावर बसून लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.